औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र मनपा निवडणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरु केली असून औरंगाबादमधील काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी शहरातील वॉर्डा-वॉर्डात फिरुन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
शुक्रवारी (दि.५ ) पदाधिकाऱ्यांसोबत बेरीबाग हर्सूल या वॉर्डाच्या विविध नागरी समस्या जाणून घेतल्या. या भागांमध्ये अद्यापपर्यंत जायकवाडीचे पाणी आलेले नाही. पाईपलाईन करण्यात आलेली नाही त्यामुळे या भागातील रहिवासी आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पाणी टँकरने मागून आपली जीविका भागवत आहेत. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत असून किमान हजार ते बाराशे कुटुंबीयांना दररोज पाणी विकत घेऊन आपली उपजीविका करावी लागते.
येथील रहिवाशांनी टॅक्स तसेच गुंठेवारी नियमानुसार महानगरपालिकेला मालमत्ता कर व नळ पट्टी भरण्यासाठी तयारी दर्शविलेली असून महानगरपालिकेने त्वरित या भागाचा सर्वे करून नवीन पाण्याची लाईन टाकण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या भागांमध्ये सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. यावेळी बोलतांना हिशाम उस्मानी यांनी सांगितले की, ‘या भागाचा जो पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन किंवा राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल व येथील पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.
याप्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी एम. ए. अजहर, बाबुराव कावस्कर, मोहसीन लकी ( वॉर्ड अध्यक्ष ) , फेरोज पटेल, अमजद खान, जाधव इत्यादी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- माधुरी-आमिर पुन्हा येणार एकत्र; दिल चित्रपटाचा लवकरच रिमेक
- पँथरची पुर्वीपेक्षाही आजची आवश्यकता जास्त- रमेश खंडागळे
- डिजिटल पेमेंट युजर्स साठी महत्वाचे ‘हे’ पेमेंट अॅप होतेय बंद !
- माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल
- एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून


