Share

तयारी मनपा निवडणुकीची: हर्सूलचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार

Published On: 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, मनपा निवडणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरु केली असून औरंगाबादमधील काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केलीय. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी शहरातील वॉर्डा-वॉर्डात फिरुन नागरिकांशी संवाद साधत आहेत.

शुक्रवारी (दि.५ ) पदाधिकाऱ्यांसोबत बेरीबाग हर्सूल या वॉर्डाच्या विविध नागरी समस्या जाणून घेतल्या. या भागांमध्ये अद्यापपर्यंत जायकवाडीचे पाणी आलेले नाही. पाईपलाईन करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील रहिवासी आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पाणी टँकरने मागून आपली जीविका भागवत आहेत. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत असून किमान हजार ते बाराशे कुटुंबियांना दररोज पाणी विकत घेऊन आपली उपजीविका भागवावी लागते.

येथील रहिवाशांनी टॅक्स तसेच गुंठेवारी नियमानुसार महानगरपालिकेला मालमत्ता कर व नळ पट्टी भरण्यासाठी तयारी दर्शविलेली असून महानगरपालिकेने त्वरित या भागाचे सर्वेक्षण करून नवीन पाण्याची लाईन टाकण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केलीय. या भागांमध्ये सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. यावेळी बोलतांना हिशाम उस्मानी यांनी सांगितले की, ‘या भागाचा जो पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, तो सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन किंवा राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. येथील पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी एम. ए. अजहर, बाबुराव कावस्कर, मोहसीन लकी वॉर्ड अध्यक्ष, फेरोज पटेल, अमजद खान, जाधव इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!