टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, कॉंग्रेसचे विधिमंडळ विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या काँग्रेस गटनेतेपदी वर्णी लागली आहे.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कॉंग्रेसचे विधिमंडळ विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत, विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामाही दिला होता. विखे यांच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळ विरोधी पक्ष नेतेपदीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांची नावे आघाडीवर होते.
दरम्यान, कॉंग्रेसचे विधिमंडळ विरोधीपक्ष नेतेपदी आमदार बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेतेपदी आमदार विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आहे. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी थोरात आणि वडेट्टीवार यांना नियुक्ती केल्याचे पत्र जारी केले आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेसने पुन्हा एकदा वडेट्टीवार यांच्या माध्यमातून आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या नेत्याला गटनेतेपद दिल्याने विधानसभेत काँग्रेसच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

