टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने समविचारी पक्षांनाबरोबर घेत आघाडी करत भाजप सेनेला शह देण्याचा चंग बांधला आहे. मात्र आता मुंबईतल्या जागांववरून आघाडीमध्ये तीव्र मतभेद असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबईतलं जागावाटप समसमान पातळीवर व्हावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांच म्हणण आहे . तर राष्ट्रवादीची मुंबईत ताकदच नाही तर अर्ध्या जागा द्यायच्या कशा असा सवाल काँग्रेसने केलाय.
लोकसभा निवडणुकीतल्या लाजीरवाण्या पराभवानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा आघाडी करत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. मात्र भाजप – सेनेला हरवण्याचा एवढा पक्का निर्धार केला असला तरी कॉंग्रेस आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद घातला जात असल्याच दिसत आहे.चर्चेत घोळ घातला जातोय अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तक्रार आहे. या चर्चेत वेळ जातो आणि मग तयारीसाठी जास्त दिवस मिळत नाही असं या नेत्यांचं म्हणणं आहे.


