कोल्हापूर : कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी अशी मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला. यावर लोकांनी टाळ््यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.
या शेतकरी मेळाव्यास प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे. समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जंगी शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि अण्णासाहेब जोल्ले यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

