Share

मुस्लिम तरुणांना ईसी-बीसी कोट्यातूनच आरक्षण मिळणार – देवेंद्र फडणवीस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करते आणि मुस्लिम आरक्षणासाठी टाळाटाळ करते या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिले जाऊ शकत नाही. भारत हा सर्व जाती धर्मांचा देश आहे. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन येतात. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर मुस्लिम तरुणांना ईसी-बीसी कोट्यातूनच आरक्षण मिळणार असून यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही, असेही फडणवीस यांनी म्हंटले.

याचबरोबर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका विद्यार्थ्याचे उदाहरण देत त्याला या कोट्यातूनच आरक्षण मिळाले असल्याचेही म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण ?

मराठा समाजाच्या आरक्षणाला मान्यता मिळताच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुस्लीम आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधला. मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र उच्च न्यायालयाने सांगूनही मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यास फडणवीस सरकारने टाळाटाळ केली आहे.

इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजाचे आमदार वारिस पठाण आणि अबू आझमी यांनी मुस्लिमांना आरक्षण देताना सरकारने भेदभाव केल्याचा आरोपही केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!