पुणे : पुण्यात चांदणी चौक भागात मुलगी टाकून निघून गेलेल्या महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तिचा समुपदेशनाची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले.
परदर्शकतेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.18) रोजी संबंधित महिला आपली चार महिन्याची मुलगी चांदणी चौक भागात ठेवून निघून गेली. त्या नंतर कोथरूड पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा शोध घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशी वारजे पुलाखाली बसलेल्या या महिलेला शोधण्यातही पोलिसांना यश आले. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले.
भाजप नगरसेवक बरळला; तुकाराम मुंढेंना म्हणाला, तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा
काल वाघ यांनी तिच्या घरी जाऊन तिची व कुटुंबियांची भेट घेतली. या महिलेची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशनाची सोय करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक किरण दगडे पाटील, भाजप युवा मोर्चाचे दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.


