नागपूर : महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा आज भडका उडाला. नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सभा घेण्याचे आदेश राज्यशासनाने दिले होते. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या या सभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरले. त्यामुळं नाराज झालेले तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले.
सगळ्यांनी हात वरकरून कस चालेल, कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल – आव्हाड
नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेत शनिवारी जोरदार गोंधळ झाला. सभेची सुरुवात होताच भाजप व कॉंग्रेस नगरसेवक मुंढेंविरोधात आक्रमक झाले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मोठ्या आवाजात मुंढे यांच्यावर हल्ला चढवला, तर कॉंग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी मुंढे हे तुकारामाच्या नावावर कलंक असल्याचे अपशब्द वापरले.
मुंढे यांनी तात्काळ जागेवरुन उठत नगरसेवकांकडून वापरल्या जाणार्या भाषेवर आक्षेप घेतला. जर नगरसेवक आवाज चढवून बोलणार असतील तर मी इथे बसणार नाही असे म्हणत मुंढे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. मुंढे यांच्या सभागृहातून निघून जाण्यावर तिथे गोंधळ झाला.
सभागृहात पॉईंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्द्यावरुन आयुक्तच आक्रमक झाले. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असताना भाजप आमदारांनी गोंधळाला सुरुवात केली. तुकाराम मुंढे बोलणं थांबवत नाहीत हे बघून भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी इथे बसणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी भर सभेत महापौरांना आणि सभेला सांगितलं.
यानंतर तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा, असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर तुकाराम मुंढे नाराज झाले. त्यातच संत तुकारामांच्या नावावरुन तुमचे नाव आहे, त्याला तरी कलंकित करु नका, असं नगरसेवक हरीश ग्वालबांशी यांनी म्हटल्यानंतर तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडले.
विकास कामे जलद गतीने पूर्ण करा – पालकमंत्री सुनील केदार
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत नागपूर महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजप व विरोधी पक्ष असलेल्या कांग्रेसने विरोधाची भूमिका घेतली आहे. भाजप व कांग्रेसच्या नेत्यांनी एकत्रीतपणे पत्रपरिषद घेत मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कांग्रेसच्या मंत्र्यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मुंढे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मुंढे यांच्या समर्थनार्थ आॅनलाईन पिटीशनला एक लाखापेक्षा जास्त नागरिकांचा पाठिंबा मिळाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

