Share

मुख्यमंत्री ठाकरेंचा अजितदादांना धक्का ? बहुसदस्यीय प्रभागाला विरोध असून सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनास्थितीमुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. तर, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, आदी महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणे अपेक्षित आहे. राज्यातील युती-आघाडीची समीकरणे बदलल्यानंतर होणाऱ्या या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महत्वाच्या असून सर्वच त्यासाठी तयारीला लागले आहेत.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी एक सदस्यीय वॉर्ड असावा अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे केली जात होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ला असणाऱ्या महापालिका पुन्हा काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली असून एक सदस्यीय वॉर्ड होईल असे संकेत दिले होते. मात्र, मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे, अजित पवार यांना हा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

कुठे, कशी आहे प्रभाग रचना ?

मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. तर, मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!