टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लाग्ल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच, पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारायला मी तयार आहे. असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. टे माध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंकज मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे या नेत्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंकज मुंडे यांनीही पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास स्वीकार्याला मी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. आणि आता याच दरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही प्रदेहाध्यक्ष पदाबाबत भाष्य केले.
पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु. असे पाटील यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असेही त्यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

