टीम महाराष्ट्र देशा : सावळज जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे सदस्य चंद्रकांत बापू पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज निधन झाले. लोणावळा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे सावळज गटावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे सावळजमधील बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सायंकाळी त्यांच्यावर सावळज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तासगांव तालुक्यातील सावळज गटाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे वृत्त धक्कादायक आहे. बापू कै. आर. आर. पाटील यांचे अत्यंत प्रामाणिक व विश्वासू सहकारी होते.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 15, 2019
दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या मिटिंगसाठी मुंबईला निघाले होते. लोणावळाजवळ नाष्टा करून गाडीत बसताना पाटील यांची शुगर अचानक वाढली. त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना लोणावळा येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
.


