Share

माझ्या हाती अजून तीन बड्या नेत्यांची प्रकरणे, कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही- किरीट सोमय्या

Published On: 

नवी-दिल्ली : सध्या भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वाद चांगलाच पेट घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गुंड माफियांचे आहे. त्यांचे ठेकेदार आणि शिष्य सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लोक आता त्यांच्या गैरव्यवहारांच्या तक्रारी माझ्याकडे घेऊन येत आहेत. गेल्या तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही,’ असे आव्हान सोमय्या यांनी केले आहे.

आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’मी जे काम करतो, त्याला आरोप म्हणून नका. मी तपास यंत्रणांना माहिती आणि पुरावे देऊन पाठपुरावा करीत असतो. पारनेर कारखान्याच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे. आता त्याला गती आली आहे,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये झालेल्या कारवाईबद्दल टीका करत ते म्हणाले की,’कोल्हापूर पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल मी मुंबईतील पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे. मला अंबाबाईचे दर्शन घेण्यापासून रोखत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात मी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. ठाकरे, पवार हे दोन ठेकेदार आणि त्यांचे शिष्य एकत्र झाल्याने महाराष्टात हाहाकार माजला आहे. सामान्य माणूस त्यांच्याविरोधात तक्रार करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, मी कोणाला घाबरणार नाही. कितीही धमक्या आल्या, कितीही वेळा अटक झाली, तरी माझे काम सुरूच ठेवणार आहे’ असेही सोमय्या यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!