चेन्नई : एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (७ फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. चेन्नईच्या उष्ट वातावरणात भारतीय गोलंदाजांना तब्बल 190.1 षटके गोलंदाजी करावी लागली.
यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल 36 षटके गोलंदाजी केली. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की बुमराह मागील बऱ्याच कालावधीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. बुमराहच्या सातत्याने क्रिकेट खेळण्यासंदर्भात गौतम गंभीरची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याच्या मते भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देवू शकतो.
एका कार्यक्रमादम्यान गंभीर म्हणाला, “मला नाही वाटत की दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहची निवड होईल. माझ्या मते भारताने त्याला गुलाबी चेंडूने होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी राखून ठेवले पाहिजे. बुमराह या मालिकेत एक्स फॅक्टर खेळाडू ठरणार आहे.”
बुमराहला अधिक गोलंदाजी देण्याबाबत देखील गंभीर काहीसा असहमत दिसला. गंभीर म्हणाला,”बुमराह कडून सलग जास्त षटके गोलंदाजी करवून घेणे चुकीचे आहे. त्याला केवळ तीन षटके गोलंदाजी करण्यासाठी बोलवावे व विकेट घेण्याचा प्रयत्न करावा. कारण बुमराह या मालिकेत फार महत्वाची भूमिका बजावणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- “पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”
- “कलाकार हे ऐकाकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालत होते; केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली”
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम


