Share

कुंबळेच्या सल्ल्यामुळे लाराने केली ताडोबा सफारी, जंगल पाहून म्हणाला धन्य झालो

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा याने बुधवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. आठवडाभरापूर्वी भारताचा गोलंदाज अनिल कुंबळे ताडोबात येऊन गेला होता. ताडोबातील जंगलाचे आणि वाघाचे फोटो त्याने लाराला दाखवले. ते फोटो पाहून लारा भावूक झाला होता .

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेशी संबंधित कार्यक्रमांकरिता लारा सध्या मुंबई येथे आला आहे. माजी भारतीय कसोटीपटू अनिल कुंबळे याने लाराला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी जाण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सफारी त्याने केल्याची माहिती आहे.

वाघासह अस्वल, रानकुत्रे असे अनेक प्राणी त्याला दिसले. अनेक पक्षीही त्याने पाहिले. ताडोबाचे जंगल त्याला इतके आवडले की हे जंगल पाहून धन्य झालो असे तो म्हणाला.सकाळच्या सफारीनंतर तो वनविभागाच्या रेस्टहाऊसला आला. याठिकाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गुरुप्रसाद यांनी त्याला ताडोबावरील पुस्तक भेट दिले आणि त्याचा सत्कार केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!