Share

मोठी बातमी : सांगलीच्या महापुरात महादुर्घटना; बचावकार्याची बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ गावामध्ये आलेल्या महापुरात बचावकार्य करणारी बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. पलूस तालुक्यात असणाऱ्या ब्राम्हणाळ गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाणारी बोट पाण्याचा प्रवाह वाढल्याने अचानक उलटली, यामध्ये ३० च्या आसपास नागरिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोटमध्ये असणाऱ्या इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास 50 हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.

दरम्यान, सांगलीत घडलेल्या दुर्घटनेवर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे, तसेच सर्व यंत्रणांना बचावकार्य करताना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. चंडीगडवरून एनडीआरएफच्या आणखीन टीमला पाचारण करण्यात आले आहे. आलमट्टी धरण्याचे पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडूरप्पा यांच्याशी संपर्क साधून असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

कोल्हापूरसाठी वाट्टेल ती मदत करायला उतरलोय, खा संभाजीराजे धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

संपूर्ण राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, कोल्हापूर, सातारा व सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सरकारसह अनेक सामाजिक संघटना नागरिकांच्या मदतीला पुढे सरसावल्या आहेत. खा. संभाजीराजे हे देखील आपल्या कार्यकर्त्यासह नागरिकांची मदत करत आहेत.

कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या बचाव तुकड्यासोबत संभाजीराजे बचावकार्य करत आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः बोललो असून त्यांना कोल्हापूरमधील पूरस्थितीची माहिती दिली, दोघांनीही पुराचा फटका बसलेल्या नगरीकांना सवर्तोपरी मदत करण्याचा शब्द दिल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

स्वारगेट भुयारी मार्गाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी घंटानाद आंदोलन

चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणतात…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!