Share

देश कोरोनाच्या विळख्यात मात्र अमित शहा लागले बिहार निवडणुकीच्या तयारीला…

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने देश संकटात सापडला आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह बिहारमध्ये देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात रुग्णांच्या संखेने १ लाख ९० हजारांच्या आकडा पार केला आहे. कोरोना योद्धे आपल युद्ध लढून देशाला संकटातून बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र या सगळ्यात भाजपने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी होणारी बिहार विधानसभेची निवडणूकही काही काळासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बिहारमध्ये निवडणूक व्हावी, असा काही जणांचा मतप्रवाह आहे. पण असे असले तरी भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

निवडणूकीचं बिगुल वाजलं, राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला मतदान

यासंदर्भातच ९ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करणार आहेत. या व्हिडिओ कॉन्फ्रसिंगमुळे बिहारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल आणि बिहारमधील निवडणुकीच्या मोहिमेच्या कार्यक्रमाची सुरवातही होईल. असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून अमित शाह एक लाख लोकांपर्यंत पोहोचतील. ते या सभेमधून पक्षाची तयारी आणि इतर कामांची माहिती देतील. त्यानंतर भाजपाचे राष्ट्र्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेसुद्धा व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून ते निवडणूक प्रचाराची तयारी सुरू करतील. अस देखील डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले आहे.

दिलासादायक : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!