Share

औरंगाबाद : भाजप खासदाराच्या पुत्रांची गुंडागर्दी, पक्षाच्याच कार्यकर्त्याला केली मारहाण

Published On: 

औरंगाबाद : कोटला कॉलनीतील रहिवासी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुणाल मराठे यांना भाजपा खासदार डॉ भागवत कराड यांच्या पुत्रानी घरात घूसुन मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजता घडली. याविषयी क्रांतीचौक ठाण्यात तीन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. वॉर्डात निर्जंतुकीकरण केल्यानं भागवत कराड यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते कुणाल मराठेंनी केला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : देवेंद्र फडणवीस

नेमकं काय आहे प्रकरण ?

मराठे हे बांधकाम ठेकेदार म्हणून काम करत असून, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून पक्षाचे काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समतानगर भागात शनिवारी करोनाचे रुग्ण सापडल्याने त्यांनी वॉर्डात निर्जंतुकीकरणाचे काम केले. यानंतर कुणाल हे घरी रात्री दहा वाजता कुटुंबासहीत जेवण करीत बसले होते. यावेळी घराचा दरवाजा ठोठावण्यात आला.

दरवाजा उघडल्यानंतर हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनवणे हे तिघे मराठे यांच्या घरात घुसले. तू वॉर्डामध्ये फिरायचे नाहीस, कारण येत्या मनपा निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार असल्याने मी लोकांना मदत करत असतो, असे म्हणत तिघांनी तू लोकांना कोणतेही मदत कार्य करायचे नाही आणि कुठलेही काम करायचे नाही, असा दम भरला. त्यानंतर मराठे यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. तर कुणाल मराठेच्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी हर्षवर्धन आणि वरुण कराड या दोन मुलांसह सोनवणे नामक व्यक्तीवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान तात्काळ वर्ग करण्याची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!