Share

‘राजस्थानात पायलट, महाराष्ट्रात पाय लट-लट’; भाजपा नेत्याने केली टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राजस्थानमधील काँग्रेसच्या सत्तेला राजकीय हादरे बसणार असल्याचे चित्र सध्या जाणवू लागले आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २५ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत.

घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? कपिल सिब्बलांचा घरचा आहेर

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारला टोमणा मारला आहे. भातखळकरांनी, ‘राजस्थानात पायलट, महाराष्ट्रात पाय लट लट..,’ अशा शब्दांत ट्विट करून खोचक टीका केली आहे.

सद्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार असून भाजपा सुरुवातीपासुनच अस्थिर सरकार म्हणून टीका करत आहे. हे सरकार कधीही पडू शकते असे त्यांचे म्हणणे असले तरी सरकारमध्ये सगळं आलबेल असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

दुर्बल घटकांचा विचार करून लॉकडाऊन करा;महापौरांचे आवाहन 

तर, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदारांसोबत दिल्ली गाठली. यामुळे गेहलोत सरकार अडचणीत आलंय. यासाठीच आता सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांनाच हजर होण्याचा आदेश दिला आहे.या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? असा थेट सवाल सिब्बल यांनी विचारला आहे. तसेच राजस्थानमधील पक्षाच्या स्थितीबद्दल काळजीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराजांनी माफी मागितल्यानंतर विषय संपायला हवा होता;भाजपच्या बड्या नेत्याने घेतली इंदोरीकरांची भेट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!