मुंबई : भाजपमध्ये विधानपरिषद उमेदवारीवरून चांगलेच अंतर्गत वाद सुरु आहेत. दरम्यान, भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना भाजपने उमेदवारी दिली.
ही निवडणूक बिनविरोध होणार आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. भाजपने अजित गोपछडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे अर्ज ८ तारखेला दाखल केले होते.
पाचवा डमी उमेदवार म्हणून कराड यांनी अर्ज भरल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी कराड यांना संधी दिल्याचे बोलण्यात येत होते. कराड हे तसे ताकदवान उमेदवार असल्याने महाविकास आघाडीलाही शंका आली होती. मात्र ती खोटी ठरली आणि कराड हे भाजपचे अधिकृत उमेदवार ठरले.
कॉंग्रेसकडून विधान परिषदेच्या उमेदवारी मिळवणारे राजेश राठोड आहेत तरी कोण ?
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनाही उमेदवारी देण्यास भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला लाल कंदील मिळाला. त्यामुळे त्यांचे राजकीय पूनर्वसन होणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत बावनकुळे आणि खडसे यांचे तिकिट नाकारण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा भाजप नेते व कार्यकर्त्यांना होती. विधानपरिषदेबाबात एकनाथ खडसे यांनी इच्छाही व्यक्त केली होती. पण, यंदाही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
मला उमेदवारी नाकारली तरी हरकत नाही ; पण खडसेंना उमेदवारी द्यायला पाहिजे होती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
