Share

BJP- भाजप नगरसेवक बालवडकरांना जामीन मंजूर

Published On: 

🕒 1 min read

एक दिवसाच्या कारावासानंतर भाजप नगरसेवक बालवडकर यांचा जामीन न्यायालयाने आज (गुरुवार) मंजूर केला आहे.

 

वाहतूक पोलिसांना दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटकेत असलेले भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर बालवडकर यांचा जामीन मंजूर केला आहे.

 

जगंली महाराज मंदिरासमोरील पार्किंगमध्ये चारचाकी उभी केल्याने वाहतूक पोलिसांनी अमोल बालवडकर यांच्या गाडीवर जॅमर लावून कारवाई केली होती. आपल्या गाडीवर कारवाई केल्याचा राग आल्याने बालवडकर यांनी वाहतूक पोलिसांना दमदाटी केली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी फिर्याद दिली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!