टीम महाराष्ट्र देशा : भाजप कडून कॉंग्रेसच्या आमदारांचा छळ करण्यात येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार पक्षांतर करत भाजपामध्ये प्रवेश करत आहे. तसेच माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हेही यांचाही छळ करण्यात आल्याने भाजपच्या दबावाखाली येऊन काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केला आहे.
शिरोडकर यांचा ७० कोटींच्या जमिनीच्या विषयावरून भाजपाने छळ केला होता तरीदेखील शिरोडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सोपटेंच्या मतदारसंघातही भाजपाने विकास कामे होऊ न दिल्याने दबावाला कंटाळून सोपटेंनीही भाजपामध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या आमदारांचा अशा प्रकारे छळ करणे हे भाजपाचे तंत्र आहे असेही हळर्णकर म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसचे दहा आमदार याआधीच भाजपमध्ये येण्यास तयार होते तर भाजपने त्यांना पक्षात घेतले नाही अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती या पार्श्वभूमीवर हळर्णकर म्हणाले, की पूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे ध्येय आहे मग जर काँग्रेसच्या एकूण पंधरापैकी दहा आमदार भाजपामध्ये येत होते तर तेंडुलकर यांनी आमदारांना का घेतले नाही असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला आहे. यावरून भाजपाचे नेते खोटे बोलतात असा आरोपही हळर्णकराणी भाजपवर केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदारांकडून भाजपमध्ये पक्षांतर करण्यात येत आहे. ही काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. काँग्रेस पक्ष या समस्येला कसे तोंड देणार हे पाहावे लागेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

