Share

मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट : आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेविरोधात भाजप नेत्याने केली पोलिसात तक्रार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच आता हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे.

२०१० ते २०१५ याकाळात रेणू शर्मा या महिलेने कृष्ण हेगडे यांना संबंध ठेवण्यासाठी वारंवार विचारणा करण्यात आली. ही महिला ब्लॅकमेल करते अशी माहिती समजताच त्यांनी तिच्या हनीट्रॅपपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न या महिलेने केला तो धुडकावून लावला असा दावा त्यांनी केला आहे. मैत्री व संबंध ठेवण्यासाठी दबाव या महिलेकडून पडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते बळी पडले नाहीत. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे.

वेगवेगळ्या क्रमांकावरून ती फोन व मेसेज करत होती. मी अनेकदा ते नंबर ब्लॉक देखील केले. ही महिला पैसे उकळण्यासाठी असे करत आहे. यावर्षी ६ व ७ जानेवारी रोजी देखील या महिलेने मला विसरला आहात का असा मेसेज केला, अशी माहिती त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली आहे. आंबोली पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केल्याचे देखील सांगितले असून धनंजय मुंडे हे मित्र नाहीत मात्र ही महिला अनेकांना पैशांसाठी फसवण्याचा प्रयन्त करत असल्याने आता पोलिसांमध्ये मी तक्रार दाखल करत आहे, असं देखील स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!