Share

मोठी बातमी : नवनीत राणा यांना शिवसेनेच्या लेटर हेडवरून अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

Published On: 

नवी दिल्ली : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना लोकसभेत शिवसेनेच्या विरोधात बोलल्यामुळे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेनेच्या लेटरहेडवर ही धमकी लिहिली गेली आहे. खासदारांनी याबाबत शिवसेनेच्या बड्या नेत्यावर आरोप ठेवत उत्तर एव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे.

एफआयआरमधील खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत की आम्हाला शंका आहे की शिवसेनेचा एक बडा नेता आणि शिवसेनेचे माजी खासदार यांनी हे पत्र पाठवले आहे. अशा प्रकारची धमकी एका खासदाराला येणे हे लोकशाहीसाठी मुळीच चांगले नाहीत. तसेच अश्लील शब्द वापरुन धमकी देणारे फोन कॉल देखील केले जात आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आहे.

नवनीत राणा या लोकसभेत विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर टीका करत असतात. ८ फेब्रुवारी रोजी देखील नवनीत राणा यांनी राज्यातील स्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर नवनीत राणा यांना एक पत्र आलं, ज्यामध्ये थेट जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती.

‘८ दिवसांत माफी मागा नाहीतर तुमच्यावर अ‍ॅसिड टाकून जीवे मारू,’ अशा आशयाचं एक पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यू येथील घरी आलं होतं. या पत्रानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आणि त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!