मुंबई : राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते.
बैठकांचे सत्र हे चार वाजता संपलं. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिब परब हे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले. बैठकी दरम्यान कर्माचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव हा राज्य शासनातर्फे एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावापेक्षा एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीगीकरण करावे ही भुमिका एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. तर राज्य शासनाच्या प्रस्तावावर थेट प्रतिक्रिया देण्याचे आमदार पडळकर यांनी टाळले आहे. सरकारने अधिकृत भुमिका जाहीर केल्यावर प्रतिक्रिया देऊ असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले आहेत. आता अनिल परब हे सह्याद्री अतिथी गृहाकडे निघाले आहेत. तिथे ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंतही आहेत. शिष्टमंडळासोबत त्यांची आत्ता बैठक सुरु आहे. त्यानंतर अनिल परब आणि शिष्टमंडळाची संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा निघणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत घाटीत झालेल्या गैरप्रकाराची मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार; खा. जलील यांचा इशारा
- ‘डोक्याला जबर मार बसला अन्…’ बिग बॉस फेम अर्शी खानचा गंभीर अपघात
- देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतिर्था’वर; चर्चेला उधाण
- पहिली ते सातवीचे वर्ग लवकरच सुरु होणार?; टोपेंचे सूचक वक्तव्य
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती–शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

