Share

बीड : आष्टी तालुक्यातील ‘त्या’ भागातील बफर झोन संपला

Published On: 

बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्या शेजारचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील कंटेनमेंट झोन (Containment Zone ) संपल्यामुळे लगत असलेल्या आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना., शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, कहेवडगांव व मातकुळे येथील लागू केलेला बफर झोन (Buffer Zone) शासनाचे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे काढून टाकण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

दिनांक 23 एप्रिल 2020 अन्वये आष्टी तालुक्याच्या लगत असलेल्या जामखेड जिल्हा अहमदनगर हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला होता यामुळे या गावापासून04 कि. मी. परिसरातील आष्टा ह.ना.,शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, कहे वडगाव, व मातकुळे यांचा गावाचा परिसर Buffer Zone म्हणून घोषीत करण्यात येऊन पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली होती.

#corona : राज्यात तब्बल २ लाख ९७ हजार व्यक्ती काँरंटाईन

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी आष्टा ह.ना., शिंदेवस्ती,चिंचपूर, भातोडी,कहेवड गाव, व मातकुळे याचा गावाचा परिसर Buffer Zone म्हणून घोषित करण्यात आला होता.कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता हा Buffer Zone म्हणून जाहिर झाल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत असे कळविले आहे. तरी या परिसरातील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल करण्यात येत आहे .

दिल्लीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने लावली हजेरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!