Share

पर्यटकांसाठी खुशखबर ! चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटकांनी आता घराबाहेर पडत पावसाळी वातावारणाचा आनंद घ्यायला सुरवात केली आहे. पावसाळ्यात पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटक धरण,नदी,धबधबे, डोंगर माथा असलेल्या ठिकाणी जाने पसंद करतात. त्यामुळे आता पर्यटकांसाठी खुशखबर आहे. कारण लोणावळा शहरातील पर्यटकांच आवडत भुशी धरण भरले असून ओव्हरफ्लो होऊ लागले आहे.

यंदा राज्यात पावसाला उशिरा सुरवात झाली. पण ही सुरवात दमदार असल्याने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तीन दिवसात शहरात ४५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भुशी धरण भरले असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागलं आहे.

घाट माथ्यावरील या पावसाळी पर्यटनाचे ठिकाण असलेल्या खंडाळा आणि लोणावळा परिसरात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पावसाचे आगमन झाल्याने वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी येथील पर्यटनस्थळांकडे धाव घेतली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!