Share

इमारत तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर बॅटने हल्ला; भाजप आमदाराचा प्रताप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे आमदारपुत्र आकाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे कर्मचारी गंजी कंपाउंडमधील मोडकळीस आलेली इमारत तोडण्यासाठी आले असता आकाश यांनी त्यांच्यावर बॅटच्या सहाय्याने हल्ला केला.

मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून सोशल मिडीयावर संतापाची लाट उसळली आहे. विभागीय अधिकारी धिरेंद्र  बायस यांचा एका भाडेकरूशी वाद झाला. इतक्यात, आमदार आकाश विजयवर्गीय तिथे पोहोचले आणि त्यांचाही अधिकाऱ्यांशी वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेत धिरेंद्र बायस यांना मारहाण केली.

दरम्यान, या प्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!