Share

तेजस्विनी पंडित का म्हणतेय, ‘बॅन लिपस्टिक’ ; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले हैराण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) तिच्या भरदस्त अभिनयामुळे सर्वपरिचित आहे. मात्र सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. मात्र ती असं का म्हणतेय, हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या व्हिडीओत तेजस्विनी तिच्या ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून टाकते. कॅप्शनमध्ये #BanLipstick असा हॅशटॅग देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी तिला प्रश्न विचारले आहेत. दरम्यान दिग्दर्शक संजय जाधव यांनी तेजस्विनीला सवाल केला, ‘क्या हुआ भाई?’ तर काहींनी कमेंट्स करत हे एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशन असू शकतं असा अंदाज वर्तवला आहे. ‘नेमकं काय झालंय’, असाही सवाल अनेकांनी तेजस्विनीच्या या व्हिडीओवर केला आहे. तर ‘चांगला उपक्रम आहे, याचं जोरदार प्रमोशन करा’, असंही एका युजरने म्हटलंय. तेजस्विनीने हा व्हिडीओ का पोस्ट केला आणि ती बॅन लिपस्टिक असं का म्हणतेय, याचं उत्तर आता तिच देऊ शकेल. मात्र तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली आहे.

https://www.instagram.com/reel/CXBVQRaI-kY/?utm_source=ig_web_copy_link

नुकतेच काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने तिच्या वडिलांच्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ‘कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने एक्झिट घेतली,’ असं म्हणत तिने दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. तेजस्विनीने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून पदार्पण केलं. ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘तु ही रे’, ‘ये रे ये रे पैसा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता तिच्या व्हिडिओमुळे तिच्याबद्दल चर्चा रंगत आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!