Share

लाखो रुपये खर्चुन पैठण नगर परिषदेला दिलेल्या घंटागाड्यांची वाईट अवस्था, सत्ताधारी-विरोधकांचे दुर्लक्ष!

Published On: 

औरंगाबाद : लाखो रुपये खर्च करून शासनाने पैठण नगर परिषदेला ९ घंटागाड्या दिलेल्या आहेत. मोठा गाजावाजा करून या घंटा गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र नगर परिषदेमार्फत केवळ औपचारिकता म्हणून स्वच्छतेची निविदा काढून ओंकारेश्वर या एजन्सीला तीन वर्षांसाठी देण्यात आली. या एजन्सीला महिन्याला साडे सोळा लाख रुपये दिले जाते. तर या घंटा गाड्यांच्या भाड्यापोटी नगरपरिषदला सहा ते सात हजार रुपये महिना दिला जात आहे. सुरुवातीला एजन्सी चालकाने गाड्यांची व्यवस्थित देखभाल केली. परंतु मुदत संपत आल्याने या घंटागाड्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सत्ताधारी-विरोधकांचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

एजन्सी चालकाच्या दुर्लक्षामुळे जवळपास सर्वच नव्या कोऱ्या घंटा गाड्यांची तीन वर्षातच दयनीय अवस्था झाली आहे. नऊ गाड्यांपैकी तीन घंटागाड्या तब्बल सहा महिने नादुरुस्त अवस्थेत नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात उभ्या होत्या. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच नादुरुस्त झालेल्या दोन घंटा गाड्यांची थातुर मातुर दुरुस्ती करण्यात आली. तब्बल सहा महिने या घंटागाड्या नादुरुस्त अवस्थेत नगर परिषद कार्यालयाच्या आवारात उभ्या असतांना  नगराध्यक्ष, वन मुख्याधिकारी,  सत्ताधारी,  विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी याबाबतीत एजन्सी चालकाला जाब विचारला नाही.

आता पुन्हा दोन घंटागाड्या नादुरुस्त झाल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसापासून उभ्या आहेत या दोन्ही गाड्यांचे सर्व चाके गायब आहेत. या गाड्यांची चाके दुसऱ्या घंट्या गाड्यांना लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. तर एका गाडीचे इंजिनचे काम करणे आवश्यक असताना ते दुरूस्ती करण्यात आली नाही. या गाड्यांची पाहणी काही दिवसापूर्वी विरोधी पक्षाचे नगरसेवक दत्ता गोर्डे व सोमनाथ परळकर यांनी केली होती. परंतु या बाबतीत त्यांनीही संबंधित ठेकेदार, विभाग प्रमुख यांना जाब विचारला नाही. सर्व नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती जोपर्यंत करून देत नाही तोपर्यंत या एजन्सी चालकाला देयके अदा करण्यात येऊ नये अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!