मुंबई : भारतीय सिनेमांच्या इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबलीमध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबती लवकरच गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लग्न करणार आहे. राणानं त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आणि यासोबत त्यानं मिहिकासोबतचा फोटो सुद्धा शेअर केला आहे.
राणानं त्याच्या साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याची सहकलाकार सामंथा अक्कीनेनी हिनंही त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. तिनं लिहिलं, ‘मर गई मैं तो’ याशिवाय सुपरस्टार अनिल कपूर यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं, शुभेच्छा माझ्या हैदराबादी मुला. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुम्हा दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया, कियारा अडवाणी, सुशांत सिंह राजपूत, किर्ती खरबंदा यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलिस यंत्रणेने घ्यावी’
भल्लालदेवची भूमिका साकारल्यानंतर राणा एवढा लोकप्रिय झाला होता की, बॉलिवूड सिनेमा द गाझी अॅटॅकमध्ये के. के. मेनन असतानाही राणाला लीड रोल देण्यात आला होता. अर्थात यानंतर तो कोणत्याही बॉलिवूड सिनेमात दिसला नाही.
न्यूज एजन्सी आयएएनएसच्या वृत्तानुसार मिहिका एक इव्हेट प्लानर आहे. ती ड्यू ड्रॉप डिजाइन स्टूडियोची मालकीण आहे. तिचा हा स्टूडियो मुंबईमध्ये आहे.
स्थलांतरित कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देणार – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
राणाचा हाथी मेरा साथी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र त्याच्या रिलीज डेट बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

