Share

श्रमिक, चाकरमान्यांना मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा; ‘या’ भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

मुंबई : लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची घरी परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी विविध राज्यांमधून ट्रेन सोडण्यात येत आहेत. पण त्यासाठी ट्रेन प्रवासाचे तिकिट शुल्क आकारले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ‘विदर्भ, कोकण, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्टयातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्हयातील श्रमिक,चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा,’ अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

‘ शासनाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठविण्याची व्यवस्था तातडीने करावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी कोरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचा फैलाव ही रोखता येईल,’ असं देखील शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘महाराष्ट्र शासन महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील मजूरांना ना वेळेत अन्नपाणी दिले ना त्यांची जाण्याची व्यवस्था करु शकले,’ असा आरोप शेलार यांनी केला आहे. किमान आपल्या राज्यातील श्रमिक, चाकरमान्यांना आरोग्य तपासणी करुन त्यांच्या मुळ गावी जाण्याची मोफत व्यवस्था करा,’ असं आशिष शेलार म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!