पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळणार नसल्याचं भाकीत केलं होतं. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल आणि हे सरकार अवघं १३ ते १५ दिवसात कोसळेल असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच शरद पवार यांनी खास त्यांच्या शैलीत मोठा धमाका केला होता.
पवारांचे मोदी सरकार कोसळण्याबद्दल केलेले भाकीत लोकसभेच्या निकालाने खोटे ठरवले आहे. आता याच मुद्द्यावरून शरद पवार यांची खिल्ली उडवली जात आहे. भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी १३ दिवस झाले की हो मोदीजींचे दुसरे सरकार येऊन…अजून पडले कसे नाही? असा थेट सवाल पवार यांना विचारला आहे.
सन्माननीय @PawarSpeaks ,
१३ दिवस झाले की हो मोदीजींचे दुसरे सरकार येऊन…
अजून पडले कसे नाही?— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) June 13, 2019
लोकसभा निवडणुकीत भाजपने गेल्या लोकसभेच्या निकालात जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा जिंकल्या. यावेळी भाजपने ३०० पेक्षा जास्त जागा जिंकत स्वबळावर स्थिर सरकार स्थापन केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

