Share

औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह? – कॉंग्रेस नगरसेवक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद कॉंग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोंग उन निवडणून आला आहे? असा सवाल नगरसेवक अफसर खान यांनी केला आहे.

औरंगाबादचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नगरसेवक अफसर खान यांनी केली. खान यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करत जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचं म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, आता पाच वर्षे माझी आहेत. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं आहे त्यांना चिरडून मारु, असं वक्तव्य जलील यांनी केले आहे. असा दावा नगरसेवक खान यांनी केला.

याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!