Share

सुरवातीच्या कलांमध्ये मनसे आणि वंचितला भोपळा….

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतदानावेळी काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेनेला बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे. मात्र सुरवातीच्या कलांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार आघाडीवर नसल्याने प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रचारात राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांना चांगलच फैलावर घेतलं होत. तर राज ठाकरे यांनी तर मला विरोधी पक्षात बसवा अशी अजब मागणी केली होती. मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळवणाऱ्या वंचित आघाडीला देखील मतदारांनी त्यांना सपशेल नाकारलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचा गड राखणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या जागा वाढविणार की घसरणार? मनसेचं खातं उघडणार का? वंचितचं काय होणार? यासगळ्यांची प्रतिक्षा आता थोड्यात वेळात संपणार आहे. या निकालांचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार असून निकालाची क्षणाक्षणाची बित्तमबातमी तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1187207812708888576?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187207723248582661?s=20

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!