मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अंकिता लोखंडे. ती सध्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. तिचा एक व्हिडिओ असा शेअर झाला की, तिचा बॉयफ्रेंड विकी जैन मात्र आश्चर्यचकित झाला आहे.
अंकिताने नुकतेच एक रील सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे रील पाहून अंकिताचा आणि बॉयफ्रेंड विकी जैनचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये अंकिताने अनारकली परिधान केला आहे. या रीलमध्ये अंकिता धनुष आणि काजय अग्रवाल यांच्या मारी या चित्रपटातील हिंदी डब्ड डायलॉग ‘भाड़ में गया प्यार व्यार, ये लव वव का कैरेक्टर अपुन को सूट नहीं करता’, वर लिपसिंग करत अभिनय करते. त्यानंतर अंकिता ब्राउन मुंडे या गाण्यावर डान्स करते. तिचे हे रील नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे.
https://www.instagram.com/reel/CU2peUJoHgB/?utm_source=ig_web_copy_link
अंकिता आणि विकी जैनचा ब्रेकअप झालेला नाही. तर तिने हा व्हिडिओ मस्ती म्हणून केल्याचे खुलासा केला आहे. मात्र यामुळे तिचा बॉयफ्रेंड नक्कीच आश्चर्यचकीत झाला. लवकरच अंकिता आणि विकी लग्न करतील अशा चर्चा सुरु असून काही दिवसांपूर्वी अंकिताने विकी जैनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने विकीला सगळ्यात चांगला बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले होते. अंकिताने हे रील तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले असून या व्हिडिओमुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- ‘अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे, मात्र राज्य सरकारने अद्यापही मदत जाहीर केली नाही’
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


