Share

अण्णा हजारे उपोषण सोडणार ? पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट केला मान्य

Published On: 

नवी दिल्ली: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीला पोचले. आज अण्णांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केला असे वृत्त आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा तिढा सुटण्याचे चिन्ह आहेत.

गिरीश महाजन यांनी अनेकदा अण्णांची भेट घेऊन त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्राच अण्णांनी घेतला आहे. तसेच उपोषणामुळे अण्णांचं वजन तब्बल साडे ५ किलोने घटले असून आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास १५ आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली आहे.

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे.२३ मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!