Share

‘अनिल परब यांचा वेळ हा मातोश्रीवरच्या गेटवर आणि भांडी धुण्यात जातो’

Published On: 

मुंबई – निसर्ग चक्रीवादळ कोकणला धडकल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरे आणि बागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. महिनाभरानंतर आजही काही गावांमध्ये विज पुरवठा सुरळीत झालेला नाही. शिवाय, काही ठिकाणी पंचनामे करताना घोळ झाल्याचे देखील समोर आले आहे.

यातच नुकतीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप आत्मनिर्भर अभियानातून करत असल्याची टीका परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली होती. या टीकेला सणसणीत उत्तर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. अनिल परब यांना कोकणात यायला वेळ नाही. त्यांचा वेळ हा मातोश्रीवरच्या गेटवर आणि भांडी धुण्यात जात असल्याची टीका राणे यांनी केली आहे.

निलेश राणे म्हणाले, आम्ही प्रश्न विचारल्या तुम्ही टीका करता. त्यापेक्षा नुकसानग्रस्त गावांची पाहणी करा. आमच्यावर टीका करायला लाजा नाही का वाटत? असा थेट सवाल राणे यांनी सामंत आणि परब या शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारला आहे.

अनिल परब यांचा समाचार घेताना राणे म्हणाले, अनिल परब मुळात आहेत कुठे? मागच्या दोन – तीन महिन्यामध्ये ते कितीवेळा रत्नागिरीमध्ये आले. त्यांनी रत्नागिरीसाठी काय केले? तिवरेवासियांसाठी काय केले? आतापर्यंत तुम्ही केलेला ड्रामा लोकांना पचला. पण, आता पचत नाही आहे. आता तुमचे सर्व उघड होत आहे. सत्ता असून पण तुम्ही असे वागणार असाल तर लोकं चपलेने मारतील अशा शब्दात यावेळी निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

भाजपच्या चुका महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील’

उद्या मुख्यमंत्री गाडी पण धुतील तर आम्ही काय करू, निलेश राणेंनी डागली तोफ

निलेश राणे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वागू नका नाहीतर…

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!