मुंबई : राजकीय ट्विट करताना चुकीचा शब्दप्रयोग केल्याने भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे हे टीकाकारांच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यात आता वंचित आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी देखील निलेश राणे यांना मर्यादा ओळखून वक्तव्य करण्याचा सल्ला दिला आहे.
दिशा शेख यांनी ट्विट करत निलेश राणेंना फटकारले आहे. राणे तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखून वक्तव्य करावे.खरतर तुम्हाला मी सुद्धा ओळखत न्हवते तुमच्या वडलांमुळे तुमची ओळख झाली.तेव्हा मानसिक संतुलन गमावल्या सारखं वागू नका नाहीतर आंबेडकरी जनता इलाज चांगला करते.ज्याचा अनुभव तुम्ही घेतलाय मागच्या दोन दिवसात, असे दिशा शेख म्हणल्या आहेत.
राणे तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखून वक्तव्य करावे.खरतर तुम्हाला मी सुद्धा ओळखत न्हवते तुमच्या वडलांमुळे तुमची ओळख झाली.तेव्हा मानसिक संतुलन गमावल्या सारखं वागू नका नाहीतर आंबेडकरी जनता इलाज चांगला करते.ज्याचा अनुभव तुम्ही घेतलाय मागच्या दोन दिवसात.
दिशा शेख
V.B.Aराज्य प्रवक्ता— Disha Pinki Shaikh (@DishaShaikh7) May 21, 2020
दरम्यान निलेश राणे यांनी एक राजकीय ट्विट करताना हिजडा असा शब्दप्रयोग केला त्यामुळे तृतीयपंथी समजाने त्यांच्या या शब्दावर आक्षेप घेतला होता. यावरून वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना शब्द मागे घेऊन समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
राणे म्हणाले की, एरवी प्रकाश आंबेडकर काय बोलतात मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही पण साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो आपण २०१९ दोन ठिकाणी लोकसभेला उभे होतात आणि मी १ ठिकाणी तरी तुम्ही दोन्ही मतदारसंघात दीड/पावणे २ लाख मतं घेतली आणि मी एकाच मतदार संघात २ लाख ७८ हजार मतं घेतली. माहितीसाठी सांगितलं. राणेंच्या या ट्विटवर दिशा शेख यांनी उत्तर दिले.

