Share

Rutuja Latke | “मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार, हा माझ्या पतीचा…”, ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Rutuja Latke | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला असून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान, मी जनतेचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांचे आभार मानते. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर जाणारच आहे. पण मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानते, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.

तसेच, ही पोटनिवडणूक आहे. माझ्या पतींचं निधन झालंय. माझं एक दु:ख आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढावी लागली, माझं पहिलं काम हेच आहे की, रमेश लटके यांची जी अर्धवट कामं राहिली आहेत, त्यांनी ज्यांना कामाचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करणार. माझी पहिली प्राथमिकता तीच असेल. त्यांचा अंधेरीचा विकास हा ध्यास होता. मीदेखील तितक्याच प्रयत्नाने विकासाचा प्रयत्न करेन, असं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचं आवाहन केलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. नागरिकांनी नोटाला का जास्त मतदान केलं? याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटाचं बटण का दाबलं, असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!