🕒 1 min read
मुंबई : चंकी पांडेची कन्या अनन्या पांडे हिने २०१९ मध्ये बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. अनन्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करताच बॉलीवूड मधील नामांकित दिग्दर्शक कारण जोहर सोबत काम केले.

अनन्याचा पहिला सिनेमा ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’चा रिमेक ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मध्ये काम केले, या सिनेमाने जास्त कमाई जरी केली नसली तरी अनन्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. अनन्याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली. अनन्याला आपल्या अभिनयासाठी फिल्म फेअर पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.

अनन्याला ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ नंतर बॉलीवूड मधून चांगल्या ऑफर देखील येऊ लागल्या २०१९ मधेच तिला दुसरा सिनेमा देखील भेटला अनन्या नंतर ‘पती पत्नी ओर वो’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसली. तर २०२० मद्धे ईशान खट्टर सोबत ‘खाली पिली’ या चित्रपटात दिसली.

दरम्यान अनन्या शकुन बत्राच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय ती विजय देवरकोंडासमवेत फाइटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
- आपल्याला केवळ सक्षम भारत नकोय तर हरित भारत हवा – उपराष्ट्रपती
- मुंबईतील २५ अनुदानित कॉलेज बंद पाडण्यापासून वाचवा- कॉंग्रेस
- ‘राज्यपालांनी रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केल्याचा फोटो पवारांना दिसला नाही’
- ‘एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’
- जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

