Share

Amol Mitkari | “पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि…”; राज्यपालांच्या विधानावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari | मुंबई : मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य केलंय. यामुळे आता एक नवी वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय.

ते म्हणाले, “आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. मराठवाडा विद्यापीठात चालू असलेल्या समारंभात शरद पवारb(Sharad Pawar) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मानाची डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी बेताल वक्तव्य करावं तसं त्यांनी केलं. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले.”

“छत्रपती शिवाजी महाराज असं बोलण्याचं त्यांनी औदार्य दाखवलं नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असं ते एकेरी बोलले”, अशा शब्दांत अमोल मिटकरींनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेत त्यांची कानउघाडणी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. जाणीवपूर्वक त्यांना प्रसिद्धीची हाव आहे का असा प्रश्न निर्माण होईल अशी त्यांची वर्तणूक आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्राबाबत, मराठी माणसाबाबत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत खालच्या पातळीचं वक्तव्य केलं. त्यावर त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!