🕒 1 min read
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली झाली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे तर त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची टेस्ट करण्यात येत असून त्यांचे रिपोर्ट येणे अजून बाकी असल्याची माहिती बच्चन यांनी दिली आहे. तर ‘माझ्या संपर्कात मागील 10 दिवसांत जे लोक आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन अमिताभ यांनी केली आहे.
T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 11, 2020
दरम्यान, राज्यात आज ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
भाजप आणि शिवसेनेचे विचार समान नव्हते हे शरद पवार यांचे विधान आश्चर्यजनक – मुनगंटीवार
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.
धोका वाढला : महाराष्ट्रात २४ तासांत रेकोर्डब्रेक ८१३९ नवीन रुग्णांची वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

