मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं. “मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत,” असं ते म्हणाले. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात अंतर होतं. विशेषतः कामाच्या पद्धतीत बराच फरक आहे. बाळासाहेबांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन अशा काही व्यक्तींचा सन्मान केला. या सर्वांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला,” असं पवार यावेळी म्हणाले. “काँग्रेसशी बाळासाहेबांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. शिवसेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती असं नाही,” असंही ते म्हणाले.
बच्चू कडू आक्रमक, …तर ‘त्या’ शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश
शरद पवारांच्या याच विधानाचा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे. “भाजप आणि शिवसेनेचे विचार समान नव्हते हे शरद पवार यांचे विधान आश्चर्यजनक आहे. गेली 30 वर्षे आम्ही सोबत होतो. समान तत्त्वावर निवडणुकाही लढवल्या आहेत. मात्र 194 दिवसातच शिवसेना आणि काँग्रेसचे विचार एक झाले याबाबत मुनगंटीवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्वाचा विचार भाजपशी विसंगत होता का? असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत का?” असाही सवालही त्यांनी पवारांना विचारला आहे.
दरम्यान, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ वाचलेली दीर्घ कविता दर्पयुक्त नव्हतीच. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, समृद्धीसाठी पुन्हा एकदा राज्य करू देत, अशीच भावना त्यात होती. पुन्हा आल्यावर महाराष्ट्र हिताचे निर्णय घेत जनतेला आनंद देणे हाच त्यातला भाव होता,” असेही ते म्हणाले.
धोका वाढला : महाराष्ट्रात २४ तासांत रेकोर्डब्रेक ८१३९ नवीन रुग्णांची वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

