सिंधुदुर्ग:- भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज उद्घाटन झाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झाले असून यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
यावेळी भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम या आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. विकास कामांना विरोध आणि उद्धाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
यावेळी नारायण राणे यांनी उद्धाटनाला अमित शाह यांनाच बोलावण्याचं कारणंही सांगितलं. ते म्हणाले की, ‘वाद झाला तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालं. त्यामुळे याच्या उद्घाटनाला देखील असाच डेअरिंगवाला माणूस हवा अशी मागणी सर्वांनी केली. मी तुम्हाला दिल्लीत भेटून महाविद्यालयाच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली. तुम्ही तात्काळ होकार दिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार’, असे राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


