Share

अमित शहा काश्मीर दौऱ्यावर तरीदेखील फुटीरतावाद्यांचा ‘बंद’ नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मागच्या तीन दशकात काश्मीरमध्ये केंद्राचे प्रतिनिधी आल्यानंतर फुटीरतावाद्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र, यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीर दौऱ्यावर असून असे पहिल्यांदाच झाले आहे की, केंद्रीय प्रतिनिधी दौऱ्यावर असून फुटीरतावाद्यांनी बंदची हाक दिली नाही.

देशाचे केंद्रीय गृहमंत्री बनल्यानंतर अमित शाह बुधवारी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. ते काश्मीर खोऱ्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून महत्वाची घोषणा करतील, अशी माहिती मिळते. सुरक्षा आणि विकास प्रकल्पांसंबंधी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका यावेळी पार पाडण्यात आल्या. सुरक्षेसंदर्भातील उच्च स्तरीय बैठकीत त्यांनी सुरक्षा यंत्रणांना दहशतवादी आणि दंगेखोरांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्यास सांगितली आहे. अमरनाथ यात्रेकरुंना कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा दलाच्या प्रमुखांना त्यांनी सर्व आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

हुरियत कॉन्फरन्सच्या सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाइज उमर फारुख यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी खोऱ्यामधील जनतेला बंद पाळण्याचे आवाहन केले नाही. तीन फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याच्या विरोधात फुटीरतावाद्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!