Share

राज्यात गृह खातं अस्तित्वात आहे की नाही? अजितदादांचा सवाल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईतल्या कफ परेड भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या तीन नराधमांनीच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. १० जून रोजी ही घटना घडली जी आज उघडकीस आली. हे तिघेही नराधम फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. याच घटनेवर संताप व्यक्त करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात गृह खातं अस्तित्वात आहे की नाही? ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. वारंवार अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. असल्या नराधमांना कडक शासन केलं पाहिजे आणि त्यातून संदेश पोहोचायला हवा की, असली कूकर्म करणाऱ्यांची गय केली जाणार नाही ! अस ट्विट करत अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!