Share

आदित्य नवखा आहे, त्याच्यात ‘मी’ पणा नाही; अजित पवारांनी केले तोंडभरून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नवीन तरुण आमदारांना कौतुकाची थाप टाकली आहे. युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘मिटिंग असली आणि कोणीही सीनिअर आले तर आदित्य लगेच खुर्ची खाली करुन देतो, मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असं वागणं नाही, अहंकार नाही, आदित्य नवखा आहे, त्याच्यात ‘मी’ पणा नाही, असे म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचे तोंड भरून कौतुक केले आहे.

तसेच ‘धीरज बोलताना तर मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असं वाटलं, बोलण्याची स्टाईल, शब्दफेक अगदी हुबेहूब विलासरावच वाटत होते, असे म्हणत पवार यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. याशिवाय पवारांनी काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचंही कौतुक केलं.

दरम्यान, आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं काम करत आहे, असे म्हणत नवीन तरुण आमदारांना अजित पवार यांनी कौतुकाची थाप दिली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1207897489799434241?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207880793709613056?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!