अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले शंकरराव गडाख यांनी मागील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. गडाख यांनी आमदार म्हणून निवडून येताच शिवसेनेला पाठींबा दिला होता. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात ते सध्या मृद व जलसंधारण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
पावभाजी विक्रेता ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री असा प्रवास करणारे आणि संपूर्ण जिल्ह्याचे भैय्या असलेले अहमदनगर शहरातील सेनेचे माजी आमदार व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे मागील दोन आठवड्यापुर्वी निधन झाले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गडाख यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होणार आहे.
निर्माणाधिन काम करताना नागरिक व मजूरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी – नाना पटोले
दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यात शिवसेनेत झालेली पोकळी भरून निघण्यासाठी मंत्री गडाख यांचा शिवसेना प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.ह्या प्रवेशाने नेवासे तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेते आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेले नाही.
अशा परिस्थितीमध्ये गडाख यांच्या रूपाने नगर जिल्ह्यात शिवसेनाला एक खंबीर, मुरब्बी व मातब्बर नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्यामुळे नक्कीच नगर जिल्ह्यातील शिवसेनाला व्यापक स्वरूप येण्यास मदत होणार आहे.गडाखांना केवळ नेवासाच नव्हे तर शिवसेना पक्षासाठी जिल्हाभर काम करावे लागणार आहे. सहकारातील एक नेता आपल्याकडे खेचून त्यांना मंत्रिपद देण्यामागे शिवसेनेची ही अपेक्षा नक्कीच असणार, अशीही एक चर्चा आहे.
उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

