मुंबई : भारतात 5G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने थेट भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान या प्रकरणी अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड झाला आहे. कायद्याचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत तिला हा दंड दिल्ली हायकोर्टाकडून करण्यात आला होता. कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीची लिंक जुहीने सोशल मीडियात टाकल्याने ही कारवाई करण्यात आली होती. केवळ प्रसिद्धीसाठी तिने ही याचिका दाखल केल्याचं कोर्टाने म्हटलं होत.
आता जुहीने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. जुहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत जुई म्हणाली, “नमस्कार, काही दिवसात गोंधळ एवढा वाढला आहे की मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही. या गोंधळात मला वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज कदाचित विसरलो आणि तो असा होता की आम्ही 5G विरोधात नाही. उलट आम्ही याचं स्वागत करत आहोत. तुम्ही ते नक्की आणा. आम्ही फक्त एवढंच बोलत होतो की, 5G सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं.”
Hear ???? pic.twitter.com/S0ypfWmS2E
— Juhi Chawla Mehta (@iam_juhi) June 9, 2021
पुढे ती म्हणाली की, “आमचं सांगणं केवळ एवढंच आहे की या टेक्नॉलॉजीबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सगळे निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला केवळ एवढंच जाणून घ्यायचं आहे की, ही टेक्नॉलॉजी लहान मुलं, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे.”
महत्वाच्या बातम्या
- ‘गिलऐवजी रोहित सोबत ‘या’ फलंदाजाला सलामीला पाठवा’ ; माजी प्रशिक्षकाचा सल्ला
- नुकसान शेतकऱ्याचं अन् फायदा विमा कंपन्यांना; राज्य सरकार नफेखोरीला चाप लावणार !
- मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राज्य सरकारचं मोठं पाऊल !
- जीआयएस प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद शहराचे उपग्रह व ड्रोनच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण!
- केंद्राने शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ केल्याचा दावा खोटा, शेतकरी नेते तुपकर यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

