अहमदनगर : यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ढोल ताशांचा निनाद नसला तरी गणरायाचे घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. बाप्पांच्या आगनामुळे सर्वत्र आनंदी वातावरण तयार झाले आहे. नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील श्री विशाल गणपती मंदिरात सकाळीच श्रींची प्रतिष्ठापणा झाली. परंपरेप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सपत्निक गणरायाची पूजा केली. कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नगरमधील मानाच्या गणपती मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विशाल गणपती मंदिरातही यंदा भाविकांना प्रत्यक्ष दर्शन मिळणार नसले तरी मंदिरात दहा दिवस होणारे धार्मिक कार्यक्रम, आरती भाविकांना सोशल मीडियातून थेट पाहता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करुन आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारताचा चीनला दणका ; मोदी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
रॅपिड अँटिजेन चाचणीतील बोगसपणा जनतेसमोर मांडणार- सुजय विखे
रोहित पवारांनी केली शहरातील युवकांनी भेट दिलेल्या पर्यावरणपुरक गणेश मूर्तीची स्थापना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

